अकोले तालुक्यातील टाहाकरीचे जगदंबा मातेचे मंदिर भूमिज प्रकारचे असून, त्याचा तलविन्यास सप्तरथ प्रकारचा आहे. हे मंदिर पश्चिमाभिमुख असून मुखमंडप, त्यामागे दोन बाजूस एक एक अंतराळयुक्त उपगर्भगृह असलेला मंडप आहे. त्रिदल पद्धतीचा गाभारा, अंतराळ, सभामंडप, मुख मंडप अशी मंदिराची देखणी रचना आहे. यातला मुख मंडप दहा खांबांवर आधारलेला असून, त्यावरूनच मंदिराची भव्यात लक्षात येते. अर्ध्यापर्यंत भिंत या भिंतीचा बाह्यभाग आणि या खांबांवर मुक्तहस्ते केलेले कोरीव काम आपले लक्ष वेधून घेते. बाह्य भागावर शिव-पार्वती, गणेश, देवी-देवता, हत्ते, व्याल, घोडे, असे प्राणी. यक्ष-यक्षिणी, अप्सरा, सूरसुंदरी, आदी देवगण आणि जोडीने काही मैथुनशिल्पे कोरली आहेत. मुखमंडपातच भिंतीलगत बसायला ओटे बांधले आहेत.
मंदिराचा मंडप बारा खांबांवर उभा आहे. पुढे तीन दिशांना गर्भगृहे आहेत. मुख्य गाभारा आणि सभा मंडप या दरम्यान अंतराळाची रचना केलेली आहे. अंतराळ आणि सभामंडपाच्या खांबावर विविध भौमितिक आकृत्या, यक्ष प्रतिमा आणि देवतांचे मुतीर्काम केले आहे. सभामंडपाच्या छतावर एकत् एक गुंफलेली वतुर्ळे आणि त्याच्या मधोमध लटकलेले एक दगडी झुंबर आहे. अंतराळात तीन भद्रांवर तीन देवकोष्ठे आहेत. मुख्य दरवाजावरही बारीक बारीक नक्षीकाम केलेले असून त्याच्या शीर्षपट्टीवर गणेश ऐवजी देवीची संकेतमुर्ती स्थापन केली आहे. बाहेर आले की तिकडचे मुतीर्काम पाहून आपण थक्क होवून जातो. मंदिराची बाह्य रचना तारकाकृती आहे. ही भिंत अगदी छोट्या छोट्या कोनात दुमडली आहे. दुमडलेल्या या भिंतीवर ओळीने मूतीर्काम केले आहे. खरे सांगायचे तर टाहाकारी मंदिराचे हेच मुख्य आकर्षण असते. गणेश, शिव-पार्वती, चामुंडा आदी देवतांबरोबरच सूरसुंदरींचे तब्बल बावीस प्रकारचे आविष्कार येथे प्रकटले आहेत! सूर सुंदरी म्हणजे देवांगना. देवांच्या खालोखाल यांचा मान. कोण आरशात स्वत:ची सुंदरता न्याहाळतेय... कोण केशरचना करण्यात गुंग आहे... कुठे नृत्य अवस्थेतील सुंदरी तर कोणी बासुरी-मृदुंग वाजविणाऱ्या... हाती पक्षी घेतलेल्या शुक सारिका, मुलाला घेतलेल्या वात्सल्य मूर्ती असे त्रिभंग अवस्थेतील नाना शिल्पाविष्कार आचंबित करतात! मुख्य मंदिराशेजारील मोडकळीस आलेल्या मंदिरावर एक शिलालेख आढळला. साल दिले होते शके १०५०. म्हणजेच इसवी सन ११२८! त्यावरून या मंदिराच्या निमार्णाच्या काळात जाता येते. काळाचा पुरावा तसेच स्थापत्य शैली यावरून हे मंदिर यादवकालीन असल्यावर शिक्कमोर्तब होते.
टाहाकारी मंदिरासारखी आणखीन काही शिल्पे खेडोपाडी उपेक्षित आहेत. या मंदिराचे आणखीन एक दु:ख म्हणजे हजार आकाराशे वर्षे जुने असलेल्या या मंदिरावर आर.सी.सी. मंडप चढवण्यात आलाय. रंगरंगोटी केल्याने मूतीर्ना शेंदूर थापल्याने मूळ सौंदर्यची नजाकत हरपल्याची खंत जाणकार व्यक्त करीत आहेत. हेमांडपंती वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या या मंदिराचा कायापालट होणे आवश्यक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा